कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या वतीने ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी आज (मंगळवार) कळंबा फिल्टर हाऊस परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये मास्क लावा, सामाजिक अंतर पाळा, वारंवार साबणाने हात धुवा, रस्त्यावर थुंकू नये, कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्या तसेच स्वच्छता राखा अशा घोषणा देत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विभागीय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर, प्रभाग मुकादम स्वप्नील साळोखे, सामाजिक कार्यकर्ते शाहरुख गाडीवले, स्वच्छतादूत अमित देशपांडे यांच्यासह निर्माण चौक रिक्षा मित्रमंडळाचे तसेच आरोग्य विभागाचे प्रभाग कर्मचारी, आशा वर्कर्स, नागरिक सहभागी झाले.