‘डीवायपी’ च्या विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियाची पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डीसीप्लेनरी स्टडीजच्या चार विद्यार्थ्यांची दक्षिण कोरियातील विविध विद्यापीठांमध्ये पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसाठी निवड झाली आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातून पीएच. डी. पदवी पूर्ण करणाऱ्या डॉ. धनाजी मालवेकर यांची चन्नॉम नशनल युनिव्हर्सिटीमध्ये, डॉ. सुप्रिया मर्जे यांची सेउल येथील डूगाक युनिव्हर्सिटी, डॉ. नवनाथ पडळकर यांची संग्यकवन युनिव्हर्सिटी येथे… Continue reading ‘डीवायपी’ च्या विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियाची पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप

महासैनिक दरबार हॉलकरिता कंत्राटी पदांची भरती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील महासैनिक दरबार हॉलकरिता कंत्राटी पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज कागदपत्रांसह १२ ऑगस्टपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. विजतंत्री- १३ हजार ५०० रुपये एकत्रित मानधनावर एक पद (विद्युत… Continue reading महासैनिक दरबार हॉलकरिता कंत्राटी पदांची भरती

महापालिका शाळेतील १८६ शिक्षकांच्या बदल्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील ५८ प्राथमिक शाळांतील १८६ शिक्षकांची बदलीची प्रक्रिया मंगळवारी राबविण्यात आली. महापालिकेच्या वि. स. खांडेकर विद्यालयात ही बदली प्रक्रिया पार पडली. शिक्षकांच्या या बदल्या करताना सर्व निकषांचे पालन करुन पारदर्शकपणे करण्यात आल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहायफ आयुक्त विनायक औंधकर,… Continue reading महापालिका शाळेतील १८६ शिक्षकांच्या बदल्या

राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

कागल (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांची राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या नावाची घोषणा विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केली. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त कागल, गडहिंग्लज, उत्तूरसह करवीरमधील शिक्षक व अंगणवाडी सेविकांना पुरस्काराने लवकरच सन्मानित करण्यात येणार आहे.… Continue reading राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

ध्येयवेडे होऊन यशाची नवीन शिखरे गाठावीत  : चंद्रदीप नरके

कळे (प्रतिनिधी) : ‘विद्यार्थ्यांनी ध्येयवेडे होऊन शिक्षणाबरोबरच सर्व क्षेत्रामध्ये यशाची नवनवीन शिखरे गाठून आपल्या कुटुंब व शाळा महाविद्यालयाबरोबरच समाजाचे नाव उज्ज्वल करावे. त्यासाठी स्वतःला झोकून देऊन नवविचारांनी अतिउच्च यश संपादन करता येते,’ असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. ते मरळी (ता. पन्हाळा) येथील दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंताच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत… Continue reading ध्येयवेडे होऊन यशाची नवीन शिखरे गाठावीत  : चंद्रदीप नरके

दहावी, बारावी फॉर्मची प्रक्रिया उद्यापासून

पुणे: महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावीच्‍या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेत प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे. त्‍यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहे. त्‍यासाठीची प्रक्रिया शुक्रवार (दि.२९) पासून सुरु होत असून, २४ ऑगस्‍टपर्यंत पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील. शिक्षण मंडळातर्फे सविस्‍तर वेळापत्रक… Continue reading दहावी, बारावी फॉर्मची प्रक्रिया उद्यापासून

नेव्हीमध्ये सोल्जरपदी नियुक्ती, श्रीधर पाटीलचा सत्कार

कोतोली (प्रतिनिधी) : माळवाडीच्या श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या वतीने इंडियन नेव्हीमध्ये सोल्जरपदी नियुक्ती झाल्याबद्दल कॉलेजच्या विद्यार्थी श्रीधर पाटील याचा नुकताच सत्कार करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील श्रीपतराव चौगुले कॉलेजचा व वाघवे गावचा विद्यार्थी श्रीधर प्रकाश पाटील याची इंडियन नेव्हीमधील सीनियर सेकंडरी रिक्रुटमेंट सोल्जरपदी नियुक्ती झाल्याने आज कॉलेजच्या वतीने संस्था सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते शाल… Continue reading नेव्हीमध्ये सोल्जरपदी नियुक्ती, श्रीधर पाटीलचा सत्कार

अकरावी प्रवेशाची पहिली यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

मुंबई / पुणे : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. अकरावीचा अर्ज पूर्ण भरण्यासाठी आता बुधवारपर्यंत वेळ मिळणार आहे. सध्या अकरावीचा प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून, अर्ज भरण्यासाठी २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन… Continue reading अकरावी प्रवेशाची पहिली यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी वचनबद्ध : अर्जुन पाटील

टोप (प्रतिनिधी) : शिक्षक बँकेच्या निवडणुकीतील विजय हा भरभरून मतदान करणाऱ्या सभासद बंधू भगिनींच्या अनमोल सहकार्यामुळे प्राप्त झाले आहे. येत्या काळात शिक्षक बँकेतील सेवेसोबत प्रशासकीय पातळीवरील सर्व प्रकारच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वचनबद्ध आहे. असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन अर्जुन पाटील यांनी केले. ते हातकणंगले तालुक्यातील नागांव येथे सत्कारावेळी बोलत होते. यावेळी राजेश जाधव, पौलस… Continue reading शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी वचनबद्ध : अर्जुन पाटील

‘डी.वाय.’ विद्यापीठाकडून कोविडची जलद निदान पद्धत विकसित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड-१९ या आजाराचे कमी खर्चात व जलद निदान करणे आता शक्य होणार आहे. ‘पीएच रिस्पॉन्सिव्ह मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल्स’चा वापर करून कोविडचे जलद निदान करण्याची पद्धत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डिसिप्लेनरी स्टडीजच्या डॉ. अर्पिता पांडे-तिवारी, रिसर्च स्टुडंट ऋतुजा गंभीर व त्यांच्या टीमने विकसित केली आहे. हे संशोधन ‘स्प्रिंगर नेचर’ च्या शोधपत्रिकेत… Continue reading ‘डी.वाय.’ विद्यापीठाकडून कोविडची जलद निदान पद्धत विकसित

error: Content is protected !!