‘डी.वाय.’ विद्यापीठाकडून कोविडची जलद निदान पद्धत विकसित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड-१९ या आजाराचे कमी खर्चात व जलद निदान करणे आता शक्य होणार आहे. ‘पीएच रिस्पॉन्सिव्ह मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल्स’चा वापर करून कोविडचे जलद निदान करण्याची पद्धत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डिसिप्लेनरी स्टडीजच्या डॉ. अर्पिता पांडे-तिवारी, रिसर्च स्टुडंट ऋतुजा गंभीर व त्यांच्या टीमने विकसित केली आहे. हे संशोधन ‘स्प्रिंगर नेचर’ च्या शोधपत्रिकेत… Continue reading ‘डी.वाय.’ विद्यापीठाकडून कोविडची जलद निदान पद्धत विकसित

दहावी सीबीएसईमध्ये चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांची बाजी : प्रा. भारत खराटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या दहावी २०२२ च्या निकालात चाटे शिक्षण समुहातील चाटे स्कूल आणि क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या निकालामुळे विद्यार्थी, पालकांनी चाटे शिक्षण समुहावर दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवल्याचे वेगळे समाधान मिळत असल्याचे चाटे शिक्षण समुहाचे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी सांगितले. प्रा.… Continue reading दहावी सीबीएसईमध्ये चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांची बाजी : प्रा. भारत खराटे

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जासाठी प्रस्ताव पाठवावेत

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज योजना सुरु आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे. अल्पसंख्याक समाजातील दहावी… Continue reading अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जासाठी प्रस्ताव पाठवावेत

‘सत्यसाई सेवा’तर्फे विद्यार्थ्यांना आरोग्य साहित्याचे वाटप

कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फ असंडोली, ता. पन्हाळा येथील प्राथमिक विद्यामंदिरमध्ये श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने १२५ विद्यार्थ्यांना डव्ह शॅम्पू बाटलीचे वितरण करण्यात आले. श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबिवले जातात. गावामध्ये दर महिन्यास मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले जातात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने डव्ह शॅम्पूचे वाटप करण्यात… Continue reading ‘सत्यसाई सेवा’तर्फे विद्यार्थ्यांना आरोग्य साहित्याचे वाटप

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सातव्या पेटंटला मान्यता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला मान्यता मिळाली आहे. ‘केमिकली कोटेड यटरबियम फॉस्फेट फिल्म ऑन सॉलिड सरफेस अँड एनर्जी स्टोरेज अॅप्लिकेशन’ यासाठी हे पेटंट जाहीर झाले असून, एका वर्षात विद्यापीठाच्या नावे झालेले हे सातवे पेटंट आहे. रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी.… Continue reading डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सातव्या पेटंटला मान्यता

डी. वाय. विद्यापीठ-माय लॅब डिस्कव्हरीमध्ये सामंजस्य करार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व प्राध्यापकांना शैक्षणिक व संशोधनात्मक विपुल संधी उपलब्ध होणार असून, सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये विकासात्मक सहभाग घेता येणार आहे. ‘माय लॅब’ या कंपनी विविध आजारांचे निदान करणारी किट विकासीत करण्यासाठी प्रसिद्ध… Continue reading डी. वाय. विद्यापीठ-माय लॅब डिस्कव्हरीमध्ये सामंजस्य करार

कमवा-शिका योजनेंतर्गत ७ विद्यार्थ्यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण कमवा व शिका योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या सात विद्यार्थ्यांना आज (मंगळवार) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना चांगले काम करून नाव उज्ज्व्ल करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे… Continue reading कमवा-शिका योजनेंतर्गत ७ विद्यार्थ्यांची निवड

डी. वाय.-घोडावत विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि संजय घोडावत या विद्यापीठांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे दोन्ही विद्यापीठांना परस्परांच्या सुविधा, उपकरणे यांचा अध्ययन आणि संशोधनासाठी वापर करण्यात येईल. प्राध्यापक, संशोधक तसेच विद्यार्थी परस्परांच्या विद्यापीठांना भेटी देऊन संशोधन करणार आहेत. या करारामुळे आंतरराष्ट्रीय सेमिनार, कार्यशाळा, संमेलने यांचे आयोजन संयुक्तपणे करता येईल. त्याचबरोबर  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय… Continue reading डी. वाय.-घोडावत विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अर्जुन पाटील, व्हा. चेअरमनपदी पद्मजा मेढे…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षकांची आर्थिकसत्ता केंद्र असणाऱ्या  बँकेत राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीची एकहाती सत्ता आली. यात प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी प्राथमिक शिक्षक समितीचे अर्जुन पाटील यांची तर व्हा. चेअरमनपदी प्राथमिक शिक्षक संघाच्या पद्मजा मेढे यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड सुकाणू समितीच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. यावेळी, आमची आहे एकच… Continue reading प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अर्जुन पाटील, व्हा. चेअरमनपदी पद्मजा मेढे…

मौनी विद्यापीठ अध्यक्षपदी आ. सतेज पाटील यांची फेरनिवड

गारगोटी (प्रतिनिधी) : येथील श्री मौनी विद्यापीठाचा अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री व आमदार सतेज डी. पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. ‘ही निवड म्हणजे माझे भाग्य समजतो. आसपासच्या परिसरातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याची संधी मिळत आहे. याबद्दल संस्थेच्या सर्व सभासदांचा मी मनापासून आभारी आहे. पुढील काळामध्ये सुद्धा विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’,… Continue reading मौनी विद्यापीठ अध्यक्षपदी आ. सतेज पाटील यांची फेरनिवड

error: Content is protected !!