टोप (प्रतिनिधी) : शिक्षक बँकेच्या निवडणुकीतील विजय हा भरभरून मतदान करणाऱ्या सभासद बंधू भगिनींच्या अनमोल सहकार्यामुळे प्राप्त झाले आहे. येत्या काळात शिक्षक बँकेतील सेवेसोबत प्रशासकीय पातळीवरील सर्व प्रकारच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वचनबद्ध आहे. असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन अर्जुन पाटील यांनी केले. ते हातकणंगले तालुक्यातील नागांव येथे सत्कारावेळी बोलत होते.

यावेळी राजेश जाधव, पौलस चौगुले, गिरीश शेळके, मेहताब मणेर, किरण पाटील, आनंदा पाटील, आनंदा गवळी, नितीन कमते, अमित सोनवणे, जनार्दन कुंभार, दत्तात्रय आसगवकर, अरुणा कोठावळे, रजनी पाटील, वैशाली पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.