कळे (प्रतिनिधी) : ‘विद्यार्थ्यांनी ध्येयवेडे होऊन शिक्षणाबरोबरच सर्व क्षेत्रामध्ये यशाची नवनवीन शिखरे गाठून आपल्या कुटुंब व शाळा महाविद्यालयाबरोबरच समाजाचे नाव उज्ज्वल करावे. त्यासाठी स्वतःला झोकून देऊन नवविचारांनी अतिउच्च यश संपादन करता येते,’ असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. ते मरळी (ता. पन्हाळा) येथील दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंताच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण होते. कळे विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघटना प्रणित श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय उपयोगी साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. अकरावी कला शाखेत प्रवेश घेतलेल्या दोन निराधार विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांच्या पालकत्वाबरोबरच संपूर्ण शैक्षणिक खर्चाचा भार समर्थ संस्थेने उचलला आहे.

यावेळी सरपंच शहाजी कांबळे, अध्यक्ष रामचंद्र बच्चे, उपाध्यक्ष बाजीराव वरपे, सचिव संभाजी दांगट, आनंदा पाटील, प्रा. पी. जे. पाटील, सुभाष पाटील, शरद दंताळ, रंगराव शिखरे, एस. के. पाटील, दादू पाटील, विलास पाटील, सर्व शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.