कोतोली (प्रतिनिधी) : माळवाडीच्या श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या वतीने इंडियन नेव्हीमध्ये सोल्जरपदी नियुक्ती झाल्याबद्दल कॉलेजच्या विद्यार्थी श्रीधर पाटील याचा नुकताच सत्कार करण्यात आला.

पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील श्रीपतराव चौगुले कॉलेजचा व वाघवे गावचा विद्यार्थी श्रीधर प्रकाश पाटील याची इंडियन नेव्हीमधील सीनियर सेकंडरी रिक्रुटमेंट सोल्जरपदी नियुक्ती झाल्याने आज कॉलेजच्या वतीने संस्था सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते शाल व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. श्रीमती व्ही. पी. पाटील, प्रकाश पाटील, निवृत्ती पाटील, डॉ. उषा पवार, डॉ. एस. एस. कांबळे व एम. एस. पवार उपस्थित होते.