कागल (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांची राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या नावाची घोषणा विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केली.

राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त कागल, गडहिंग्लज, उत्तूरसह करवीरमधील शिक्षक व अंगणवाडी सेविकांना पुरस्काराने लवकरच सन्मानित करण्यात येणार आहे.

प्राथमिक विभाग- आदर्श विस्तार अधिकारी- सारिका कासोटे (पं.स. कागल), आदर्श मुख्याध्यापक- सुनंदा कोरवी (रामकृष्ण नगर), आदर्श शिक्षक- शिरीन नाईक (दत्त विद्यामंदिर कागल), अनिल पाटील (म्हाकवे), राजाराम इंगवले (बानगे), शामराव निकम (भैरेवाडी), सचिन पाटील (हमीदवाडा), विजय परीट (वडगाव), वनिता घाटगे (यादववाडी), शाकिरा देशमुख (कसबा सांगाव), नंदा संकपाळ (बेलवळे बुद्रुक), रेखा पोतदार (एकोंडी), आनंदा मालवेकर (सावर्डे बुद्रुक), सुरेखा मगदूम (बामणी).

सुजाता माळवदे (शाहूनगर), सुजाता पाटील (भादवण), महेश रामचंद्र कांबळे (धामणे), तेजा कांबळे (बेलेवाडी काळमा) स्वप्नाली कतगर (कणेरीवाडी), रूपाली मगदूम (वडणगे), सारिका फाळके, दशरथ प्रकाश सुतार (सावर्डे बुद्रुक), राजाराम मेथे (सिद्धनेर्ली), प्रकाश देशपांडे (हेब्बाळ कसबा नूल), दिनकर खवरे (मुमेवाडी), सुनील कांबळे (जगतापवाडी), आनंदराव कुंभार (गजरगाव ता. आजरा), गीता माळवी (माणगाव), सुवर्णा रेडेकर (ऐनापूर) नंदकुमार येसादे (अर्दाळ), शिल्पा कमते (केनवडे), स्नेहा पाटील (गिजवणे) धोंडिराम यमगेकर (आदर्श विद्यामंदिर).

माध्यमिक विभाग : आदर्श मुख्याध्यापक- अनिल खामकर (बाचणी), शिवाजी येसणे (आजरा), प्रकाश कोकितकर (हळदी), राजाराम पाटील (कणेरी), शिवगोंडा खंबराये (नागोजीराव पाटणकर हायस्कूल), संदीप चौगुले (माईसाहेब बावडेकर हायस्कूल), सुरेश मगदूम (कणेरी), बाबासो मांडरेकर (खंजिरे हायस्कूल), सविता पाटील (रणदिवेवाडी), संगीता विलास पाटील (अर्जुननगर), लता पाटील (कागल).

रवींद्रकुमार जालीमसर (मुरगूड), अशोक घाटगे (कागल), धनंजय बी साळुंखे (कागल), नामदेव मधाळे (अर्जुननगर), रघुनाथ नढाळे (माने कॉलेज), सायली सावेकर (मॉडर्न स्कूल कागल), आर. जी. पाटील (मुरगूड),  भारती सुतार (हळदी), संजय नाईक (गडहिंग्लज), वैशाली कागवाडे (मुत्नाळ), गंगाराम शिंदे (गडहिंग्लज), विठ्ठल पुजारी (बटकणंगले), सुनील देसाई (जागृती हायस्कूल, गडहिंग्लज), सुरेश बामणे (अरळगुंडी), बाळकृष्ण भोसले (बेलेवाडी), बाबूराव गाडीवडर (कडलगे), मंजूषा मुसाई (हिरलगे). आदर्श क्लार्क- यशवंत ऊर्फ बाळासाहेब पाटील (वाळवे खुर्द)