कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डीसीप्लेनरी स्टडीजच्या चार विद्यार्थ्यांची दक्षिण कोरियातील विविध विद्यापीठांमध्ये पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसाठी निवड झाली आहे.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातून पीएच. डी. पदवी पूर्ण करणाऱ्या डॉ. धनाजी मालवेकर यांची चन्नॉम नशनल युनिव्हर्सिटीमध्ये, डॉ. सुप्रिया मर्जे यांची सेउल येथील डूगाक युनिव्हर्सिटी, डॉ. नवनाथ पडळकर यांची संग्यकवन युनिव्हर्सिटी येथे तर डॉ. श्रीकांत सदावर यांची चुंगआन युनिव्हर्सिटी येथे पदव्युत्तर संशोधांसाठी नियुक्ती झाली आहे. या सर्वांचा संशोधन खर्च विद्यापीठाकडून केला जाणार आहे. संशोधन पूर्ण झाल्यावर या विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियात पूर्णवेळ संशोधक म्हणून नियुक्तीची संधी उपलब्ध आहे. या विद्यापीठांमध्ये उर्जा निर्मिती करणारे पदार्थ व त्यांचा उर्जा साठवणुकीसाठीचा उपयोग या विषयावर संशोधन चालते.

या चारही विद्यार्थ्याना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. जयंत गुंजकर व डॉ. उमाकांत पाटील यांचे संशोधांसाठी मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरु डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.