‘सातार्डे’ बेकायदेशीर उत्खननातून कोट्यावधीची लुट : ठोस कारवाई कधी?

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील सातार्डे गावातील गट नं. ८५९/२०० मध्ये गेल्या काही वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचे अवैध्य उत्खन्नन सुरु आहे. विशेष म्हणजे हि जमीन वर्ग २ प्रकारात मोडते. ‘लाईव्ह मराठी’ने प्रत्यक्ष उत्खन्ननाच्या ठिकाणी जाऊन पाहिले असता अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे. यावर संबधित विभाग ठोस कारवाई का करत नाहीय असा प्रश्न निर्माण होत आहे. … Continue reading ‘सातार्डे’ बेकायदेशीर उत्खननातून कोट्यावधीची लुट : ठोस कारवाई कधी?

हालोंडी येथे दोन गटात मारहाण : परस्परांविरोधी गुन्हा दाखल

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हालोंडी येथे दोन शेजारी राहणाऱ्या गटात तलवार, कोयता, कुऱ्हाड, लोखंडी गज आणि काठ्यांनी झालेल्या मारामारीत सातजण जखमी झाले आहेत. त्यांनी परस्परां विरोधात शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे फिर्यादी जयप्रकाश बापुसो पाटील (वय ६०, रा. हालोंडी, ता. हातकणंगले) आणि अर्चना काकासो पाटील (रा.… Continue reading हालोंडी येथे दोन गटात मारहाण : परस्परांविरोधी गुन्हा दाखल

आजऱ्यामध्ये ४ लाख ७० हजारांचे अवैध मद्य जप्त…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा-आंबोली मार्गावर तुलसी धब्यानाजीक आज सायंकाळी आजरा पोलिसांनी कारवाई करत गोवा बनावटीची एका टेम्पोंसहीत ४ लाख ७० हजार किंमतीचे मद्य जप्त केले. यामध्ये शिवाजी ग्यानबा भुते आणि गणेश महादेव पिंगळे हे दोघे (रा. खर्डा ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांना आजरा पोलिसांनी अटक केली आहे. तसेच टेम्पो (एमएच ४२ बी ९८७३) हा जप्त… Continue reading आजऱ्यामध्ये ४ लाख ७० हजारांचे अवैध मद्य जप्त…

आदमापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन करीत लग्न केल्याप्रकरणी ५० लोकांवर गुन्हा…

गारगोटी (प्रतिनिधी) : आदमापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन करीत विनापरवाना दारात मंडप टाकून गर्दी जमवून लग्नकार्य केल्याबद्दल वरपिता, नवरा-नवरी, भटजीसह ५० लोकांवर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे शिवाजी केरबा पाटील यांच्या मुलाचे लग्न होते. यावेळी विनापरवाना दारात मंडप टाकून कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता लोकांच्या उपस्थितीत  लग्नकार्य… Continue reading आदमापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन करीत लग्न केल्याप्रकरणी ५० लोकांवर गुन्हा…

कुरुंदवाड येथे भर वस्तीत शहरातील माजी उपनगराध्यक्षांवर हल्ला…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेपासून काही अंतरावर पाणीपुरवठा सभापती जवाहर उर्फ बाबासो पाटील यांच्यावर आज (मंगळवार) सकाळी खुनी हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान पाणीपुरवठा… Continue reading कुरुंदवाड येथे भर वस्तीत शहरातील माजी उपनगराध्यक्षांवर हल्ला…

आयटीआय कोव्हिड सेंटरमधून पलायन केलेल्या दोन कैद्यांना अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या आयटीआय कोव्हिड केअर सेंटर मधून १३ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास लोखंडी गज काढून पलायन केलेल्या खून आणि दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील न्यायालयीन दोन केद्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. प्रतिक सरनाईक (वय ३० रा. आर. के. नगर, साई कॉलनी) आणि गुंडाजी नंदीवाले (वय २८,… Continue reading आयटीआय कोव्हिड सेंटरमधून पलायन केलेल्या दोन कैद्यांना अटक…

शिरोली पुलाची येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

टोप (प्रतिनीधी) : शिरोली पुलाची येथे बाबासाहेब कांबळे यांच्या शेतात तीन पानी जुगार खेळताना चौघांना शिरोली पोलिसानी अटक करून त्यांच्याकडून १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. बाबासाहेब कांबळे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये प्रितम ज्ञानदेव कुरणे, योगेश कालिदास कांबळे, रूपेश श्रीकांत कांबळे, अरूण यशवंत हंकारे (सर्वजण रा. शिरोली पुलाची) हे तीन पाणी जुगार खेळत असल्याची… Continue reading शिरोली पुलाची येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

सरवडे येथील दूधगंगा नदीत आढळला बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह…

सरवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील  सरवडे येथील दूधगंगा नदीपात्रात अंदाजे ३५ ते ४० वर्षाचा पूर्णतः सडलेला आणि लोखंडी तार, दोरीने दगडाला बांधलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पूर्णतः सडलेला असल्याने पोलीसांनी जागेवरच पंचनामा केला. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील वंदना गुरव यांनी राधानगरी पोलीसांत दिली आहे. सरवडे येथील दूधगंगा नदीपात्रात मांगेवाडी हद्दीत शेतातील… Continue reading सरवडे येथील दूधगंगा नदीत आढळला बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह…

पाटणे फाटा येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई…

चंदगड (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मे पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पुकारला गेला आहे. चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा बरेच लोक विनामास्क तसेच कोणतेही काम नसताना गाडी घेऊन फिरताना दिसतात. काही शेतकरी हे खोटे कारण सांगून पोलिसांवर दबाव आणायचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन दिवसांत… Continue reading पाटणे फाटा येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई…

आळते येथे गळफास घेऊन शेतमजूराची आत्महत्या…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळते येथे संजय शिवलिंग कुंभार (वय ४७) यांनी राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय कुंभार हा शेतमजूर म्हणून काम करतो. आज सकाळी घरी कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची फिर्याद संजयचे चूलत भाऊ कुबेर कुंभार… Continue reading आळते येथे गळफास घेऊन शेतमजूराची आत्महत्या…

error: Content is protected !!