गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी शहर आणि परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिला आणि पुरुष अशा ४० जणांवर भुदरगड पोलीस ठाण्याने कारवाई केली. यावेळी  प्रत्येकी रुपये ५०० रुपयांचा दंड आणि दोन तास पोलीस स्टेशनमध्ये थांबण्याची शिक्षा देण्यात आली. दरम्यान, ही दंडाची रक्कम देण्यासाठी लोकांच्या नातेवाईकांची धावपळ झाली होती.

भुदरगचे पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी, लॉकडाऊन काळात जनतेला घरात थांबण्याची गरज असतानाही अनेक कारणे सांगून लोक घराबाहेर पडत आहेत. आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही ते बाहेर पडत आहेत. त्यामुळे ही मोहीम उभारली असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले.