कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेकायदेशीररित्या विदेशी दारू विकणार्‍या गुलशन गोपालदास अहुजा (वय २५, रा. शिरू चौक गांधीनगर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४४ हजार २७९ रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त केले.

जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू असताना  अहुजा घरात दारूचा साठा करून विकत होता. याबाबत पोलीस नाईक राजेंद्र दिनकर कुंभार यांनी फिर्याद दिली असून अहुजा याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.