हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळते येथे संजय शिवलिंग कुंभार (वय ४७) यांनी राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय कुंभार हा शेतमजूर म्हणून काम करतो. आज सकाळी घरी कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची फिर्याद संजयचे चूलत भाऊ कुबेर कुंभार यांनी हातकणंगले पोलीसांत दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.