जिल्हयामध्ये बांधावर खत वाटपासाठी यूरिया खत उपलब्ध : सतिश पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषद कृषि विभागाला सन २०२०/२१ करिता शासनाने कोल्हापूर जिल्हयासाठी १००० मेट्रिक टन यूरिया खताचा बफर स्टॉक मंजूर केलेला आहे. त्यापैकी जिल्हयासाठी १०८ मेट्रिक साठा प्रत्यक्षात महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांचेकडे उपलब्ध झालेला आहे. हा साठा शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटपासाठी उपलब्ध झाल्याचे जि. प. चे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सभेत… Continue reading जिल्हयामध्ये बांधावर खत वाटपासाठी यूरिया खत उपलब्ध : सतिश पाटील

राधा शुगर्सने एफआरपी थकबाकी त्वरित द्यावी, अन्यथा…

चंदगड (प्रतिनिधी) : फराळे येथील राधा शुगर कारखान्याने २०१८-१९ सालची एफआरपी थकबाकी त्वरीत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच प्रसंगी कारखाना प्रशासनावर गुन्हा दाखल करावी, अशी मागणी उस उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांकडून याबाबतचे निवेदन आज (शुक्रवार) चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले.   चंदगड तालुक्यामध्ये ऊसाचे पीक जास्त प्रमाणात असल्यामुळे… Continue reading राधा शुगर्सने एफआरपी थकबाकी त्वरित द्यावी, अन्यथा…

पुरबाधीत क्षेत्रातील शेतकऱ्यांची येणे रक्कम लवकर द्यावी : चंद्रदीप नरके

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०१९-२० मधील पुरबाधित सामाईक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना येणे असणारी रक्कम लवकरात लवकर द्यावी. अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी निवेदनाद्वारे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली. निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने सन २०१९-२० या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूरामूळे पुरबाधीत झालेल्या क्षेत्राला प्रतिगुंठा… Continue reading पुरबाधीत क्षेत्रातील शेतकऱ्यांची येणे रक्कम लवकर द्यावी : चंद्रदीप नरके

पूर, अतिवृष्टीधारकांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर  

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील पूर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी, नागरिकांसाठी राज्य सरकारने आज (शुक्रवार) १० हजार कोटींची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ही मदत खरडून गेलेल्या शेती आणि शेतीच्या नुकसानीसाठी असणार आहे. दिवाळीपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत पोहोच करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आज मुख्यमंत्री… Continue reading पूर, अतिवृष्टीधारकांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर  

‘ही’ रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करणार : महादेवराव महाडिक

टोप (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून सन २०१७, १८ हंगामातील देय असलेल्या रक्कमेपैकी १०७ रुपये प्रति मेट्रिक टन या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, छ. राजाराम… Continue reading ‘ही’ रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करणार : महादेवराव महाडिक

‘या’ तालुक्यात मालमत्तेची बिनचूक मोजणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कागल तालुक्यातील ३९ गावातील आणि करवीर तालुक्यातील ५५ गावातील जागांमधील जमिनीचे (ज्या सामान्यत: केवळ कृषी विषयक प्रयोजनात वापरण्यात येत असतील अशा जमिनी खेरीज) भूमापन करण्याचे आदेश ८ मार्च २०१९ च्या अधिसूचनेद्वारे शासनाने दिले आहेत. त्यानुसार नोव्हेंबरपासून भूमापन अधिकारी हे काम सुरु करतील. भूमापन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या तारखेस घराच्या व इतर मालमत्तेच्या… Continue reading ‘या’ तालुक्यात मालमत्तेची बिनचूक मोजणी

अवकाळी पावसामुळे गळीत हंगाम लांबणीवर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मॉन्सुनच्या परतीच्या पावसाने जोरदार झोडपून काढले आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परिणामी यंदाचा ऊस गाळपाचा हंगाम लांबणीवर पडणार आहे. काही कारखान्यांनी ऊस तोडणी मजूर कारखाना कार्यस्थळावर आणले आहेत. पण पावसामुळे ऊस तोडणी सुरू करता आलेली नाही. ऑक्टोबर महिना सुरू झाला की ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना गळीत हंगामाचे वेध… Continue reading अवकाळी पावसामुळे गळीत हंगाम लांबणीवर

आता पोलिसांचा पगार ‘एचडीएफसी’ बँकेतून…

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रालयीन कर्मचारी आणि मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बॅंकेत जमा होणार आहेत. या बँकेकडून पोलिसांना आता लाखो नाही तर कोट्यवधींचे विमा संरक्षण मिळणार आहे. अ‍ॅक्सिस बँकेशी झालेल्या कराराची मुदत संपल्यानंतर आता एचडीएफसी बॅंकेशी राज्य सरकारने करार केला आहे.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ साली अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात… Continue reading आता पोलिसांचा पगार ‘एचडीएफसी’ बँकेतून…

‘वारणा’कडून दूध फरकबिलांसाठी ३० कोटी : डॉ. विनय कोरेंची घोषणा

वारणानगर (प्रतिनिधी) : येथील वारणा सहकारी दूध संघाकडून दिवाळीसाठी दूध फरक बील, कामगारांना पगार व बोनस यासाठी तब्बल ३० कोटी रुपये देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केली. म्हैस दूधासाठी प्रतिलिटर २ रुपये १० पैसे फरकबील देण्यात येणार असून २६ ऑक्टोबरपासून उत्पादकांच्या खात्यावर जमा होईल,… Continue reading ‘वारणा’कडून दूध फरकबिलांसाठी ३० कोटी : डॉ. विनय कोरेंची घोषणा

मी आकडे सांगायला आलेलो नाही : मुख्यमंत्री

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभे करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही, जे करणार ते तुमच्या समाधानासाठी करु, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मी तुम्हाला नवीन नाही किंवा… Continue reading मी आकडे सांगायला आलेलो नाही : मुख्यमंत्री

error: Content is protected !!