कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषद कृषि विभागाला सन २०२०/२१ करिता शासनाने कोल्हापूर जिल्हयासाठी १००० मेट्रिक टन यूरिया खताचा बफर स्टॉक मंजूर केलेला आहे. त्यापैकी जिल्हयासाठी १०८ मेट्रिक साठा प्रत्यक्षात महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांचेकडे उपलब्ध झालेला आहे. हा साठा शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटपासाठी उपलब्ध झाल्याचे जि. प. चे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सभेत सांगितले.

सतीश पाटील म्हणाले की, ज्या गावामध्ये शेतकरी वर्गाला युरियाची आवश्यकता आहे. अशा शेतकऱ्यांनी एकत्रित गट तयार करुन त्याप्रमाणे नांवे, फोन नंबर व मागणी पत्र तयार करुन प्रति यूरिया बँगसाठी २६६.५० रुपयांची रक्कम जमा करावी. ही रक्कम महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्याकडे भरणा करावयाची आहे. यासाठी कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे कृषि सहाय्यकांकडून तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत सदरची यूरिया खताची मागणी कमीत कमी दहा टन पर्यंत करावी. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन सतीश पाटील यांनी केले.

या सभेस कृषि समिती सदस्य हेमंत कोलेकर, शंकर पाटील, कल्पनाताई चौगूले, मनोज फराकटे, अश्विनी धोत्रे, सचिव चंद्रकांत सुर्यवंशी उपस्थित हाते.