कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०१९-२० मधील पुरबाधित सामाईक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना येणे असणारी रक्कम लवकरात लवकर द्यावी. अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी निवेदनाद्वारे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने सन २०१९-२० या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूरामूळे पुरबाधीत झालेल्या क्षेत्राला प्रतिगुंठा ९५० रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई घोषणा केली होती. त्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जिल्ह्यातील बहूतांशी विकास संस्थांकडे जमा झाली आहे. परंतु सामाईक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील पुरबाधीत सामाईक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना येणे असणारी रक्कम मिळण्यासाठी संबंधीतांना योग्य ते आदेश द्यावेत, असे म्हटले आहे.

यावेळी बाळासो भोसले, प्रा. राजेंद्र पाटील, नामदेव पाटील, बाळासो पाटील, आनंदा पाटील उपस्थित होते.