अमेरिकेत बाप्पाच्या डोक्यावर शोभणार रत्नागिरीच्या बनेंचा फेटा…

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) : लाडका गणपती बाप्पा खुलून दिसावा म्हणून हल्ली त्याच्या डोक्यावर खराखुरा फेटा बांधला जातो. रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या ऍडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली असून तिथल्या सावंत कुटुंबातील बाप्पाच्या डोईवर हा फेटा सजणार आहे. या कारणांमुळेच फेटा थेट अमेरिकेपर्यंत पोहोचला.. रत्नागिरीतील कर्ला या गावात राहून… Continue reading अमेरिकेत बाप्पाच्या डोक्यावर शोभणार रत्नागिरीच्या बनेंचा फेटा…

कोल्हापूरच्या एसटी चालकाची राजापूरात आत्महत्या…

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर एसटी डेपोत कार्यरत असणाऱ्या चालकाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनिल शिवाजी दिवसे (वय ४१ सध्या रा. एसटी डेपो राजापूर, मूळ गाव नागदेववाडी, जि. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. मात्र, अनिलने हे टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अनिल दिवसे हे सात ते… Continue reading कोल्हापूरच्या एसटी चालकाची राजापूरात आत्महत्या…

देवगडमध्ये बदलापूर घटनेचा मविआकडून मूक निषेध

देवगड(प्रतिनिधी) :बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व कोलकत्ता येथील एक महिला डॉक्टर वरील अत्याचार या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने देवगड तालुका इंडिया महाविकास आघाडी यांच्या वतीने देवगड येथे काळ्या फीत लावून व काळ्या फितीने तोंड बंद करून शांततेच्या मार्गाने काळे झेंडे दाखवून निदर्शने करून मूक निषेध… Continue reading देवगडमध्ये बदलापूर घटनेचा मविआकडून मूक निषेध

बोटीवर चहा करत असताना स्टोव्हचा भडका : एकाचा मृत्यू

देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथे मासेमारी नौकेवर चहा करीत असताना स्टोव्हचा भडका होवून एकजण गंभीर जखमी झाला होता. संजय महादेव पाटील (वय ५०, आडिवरे डोंगरवाडी) यांचा २० ऑगस्ट रोजी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड येथे मासेमारी नौकेवर चहा करीत असताना स्टोव्हचा भडका होवून कपड्याने पेट घेतला. या… Continue reading बोटीवर चहा करत असताना स्टोव्हचा भडका : एकाचा मृत्यू

आचरा समुद्रात मच्छिमार नौका उलटून तिघांचा मृत्यू : एक बचावला

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आचरा येथील समुद्रात नारळी पौर्णिमेच्या उत्सवाच्या दिवशी पहाटे मच्छीमारी नौका खडकाला आदळल्याने या तिघांच्या मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एकजण बचावला आहे. आचरा समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली सर्जेकोट येथील एक होडी दाट धुक्यामुळे समुद्रातील खडकाळ भागाचा अंदाज न आल्याने एका मोठ्या खडकाला जोरदारपणे आदळली. या होडीत… Continue reading आचरा समुद्रात मच्छिमार नौका उलटून तिघांचा मृत्यू : एक बचावला

देवगड तालुक्यात विवाहितेवर अत्याचार : संशयीत आरोपीला जामिन मंजूर

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील एका विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली होती. ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने अँड. अविनाश माणगांवकर, अँड. सिद्धेश माणगांवकर आणि अँड. श्रुती माणगांवकर यांनी युक्तिवाद केला. फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत संशयित आरोपीने एका विवाहितेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी… Continue reading देवगड तालुक्यात विवाहितेवर अत्याचार : संशयीत आरोपीला जामिन मंजूर

विजयदुर्गमध्ये साकारणार आरमारी म्युझियम : प्रमोद जठार

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यामध्ये ब्रिटिश खगोल शास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी हेलियम वायूचा शोध लावला. ही घटना समस्त विजयदुर्ग तसेच महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने शोधाचे जनक होण्याचे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले. ते विजयदुर्ग किल्ला येथे १५६ व्या जागतिक हेलियम डे निमित्त कार्यक्रमात बोलत होते. प्रमोद जठार यांनी, ऐतिहासिक विजयदुर्ग… Continue reading विजयदुर्गमध्ये साकारणार आरमारी म्युझियम : प्रमोद जठार

तळवडे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद जोईल…

देवगड (प्रतिनिधी) : तळेबाजारातील दत्तप्रसाद जोईल यांची तळवडे ग्रामसभेत एकमताने महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी प्रसाद दुखंडे यांची निवड करण्यात आली. यावेळी तळवडे ग्रामपंचायत आणि श्री गणेश उत्साही मंडळाच्या वतीने दत्तप्रसाद जोईल याचे अभिनंदन करण्यात आले. दतप्रसाद जोईल यांनी, ग्रामस्थांचे आभार मानत दिलेल्या पदाला न्याय देऊन गावातील तंटे… Continue reading तळवडे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद जोईल…

कोटकामते ग्रुप सोसायटीच्या कारभाराची चौकशी करा : शेतकऱ्यांची मागणी

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील कोटकामते ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित या संस्थेमधील चाललेल्या अनियमित कारभाराची चौकशी करा. तसेच दोषींवर कारवाई करा, अशी तक्रार खुडी कोटकामते गावातील शेतकऱ्यानी सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, कोटकामते खुडी गावामधील शेतकरी कोटकामते ग्रुप विकास सोसायटी मर्या. या संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेचा कारभार… Continue reading कोटकामते ग्रुप सोसायटीच्या कारभाराची चौकशी करा : शेतकऱ्यांची मागणी

देवगडच्या अमित पाध्ये यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘वारसा’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार

देवगड (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या मर्दानी खेळावर तयार करण्यात आलेल्या वारसा माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. देवगडचे सुपुत्र संगीतकार अमित पाध्ये यांनी या माहितीपटाला संगीत दिले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आणि देवगडची मान उंचावली आहे. सचिन सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळावर हा माहितीपट तयार केला आहे. 2022 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार आर्ट अँड कल्चर… Continue reading देवगडच्या अमित पाध्ये यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘वारसा’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार

error: Content is protected !!