कुडाळ (प्रतिनिधी) : अवघ्या सर्व ज्युनिअर कॉलेजना उत्सुकता लागून राहिलेल्या ‘सुपर 30’च्या ‘CVRaman_बॅच’ला ‘ब्रीज कोर्स’ ने धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. मुख्य हायब्रीड प्रोग्राम सुरू होण्यापूर्वीच इ. 10 वीच्या विद्यार्थी तसेच पालकांमध्ये या बॅचबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ‘लाईव्ह मराठी’ या बॅचचा मीडिया पार्टनर आहे.

‘सुपर 30’ ची ‘CVRaman_बॅच’ 1 एप्रिल पासून सुरू झाली आहे. इ. 8, 9 आणि 10 वी विज्ञान, गणित विषयाच्या जटील संकल्पना समजून घेणे तसेच भविष्याचा वेध घेताना कोणता निर्णय योग्य-अयोग्य यासाठी इ. 10 वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत. ‘सुपर 30’ चा ‘विद्यार्थी, शिक्षक, पालक मेळावा नुकताच पार पडला. यामध्ये 10 वी नंतर काय तसेच नवीन शैक्षणिक धोरण 2020 या विषयांवर पालकस्तरावर चर्चा रंगली. या मेळाव्याला पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा ‘CVRaman_बॅचमध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही.

इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांना ‘सुपर 30’ पुरस्कृत ‘CVRaman_बॅचमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक पालक आणि विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 9421193921, 9421193901 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.