सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जो पक्ष संपुर्ण जगात मोठा असल्याचा दावा करतो. त्या पक्षाला सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार मिळत नाही हे दुर्दैव आहे, असा आरोप आज (मंगळवार) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला.

ज्या नारायण राण्यांचे नाव चर्चेत आहे, त्यांनी केंद्रीय मंत्री असून सुद्धा कोकणासाठी काही केले नाही. त्यामुळे या ठिकाणी विनायक राऊत यांनाच तिसऱ्यांदा येथील मतदार बहुमताने निवडून देतील, असा विश्वास परुळेकर यांनी व्यक्त केला. तसेच भाजपा म्हणजे सुक्या गजाली, त्यांच्यावर लोकांना विश्वास नाही तर दुसरीकडे शिंदे गटात गेलेल्यांना लोक आता गद्दार म्हणून हिणवू लागले आहेत असा ही टोला त्यांनी लगावला.

परूळेकर यांनी, ज्यांना निवडणूक लढण्यासाठी आग्रह केला जात आहे. तेच निवडणुका लढायला तयार नाहीत असे दिसून येत आहे. त्यामुळे राणे घाबरलेत की काय ? अशी शंका जनतेच्या मनात उद्भवत आहे. केंद्रात मंत्रिपद असलेल्या नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती सूक्ष्म व लघु उद्योग आणलेत.

सी वर्ल्ड प्रकल्प जनतेला एकत्र घेऊन केला असता तर त्याला विरोधात झाला नसता असे मत परुळेकर यांनी व्यक्त केले. त्यामुळे जनतेसोबत सलोख्याचे संबंध ठेवणारे खासदार विनायक राऊत यांचा निवडणूकी अगोदरच विजय निश्चित आहे. असे ते यावेळी म्हणाले.