कुडाळ (प्रतिनिधी) : डॉ. शामसुंदर परूळेकर ह्यांचा वैद्यकीय वारसा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र डॉ. मकरंद परूळेकर आणि डॉ. गौरी परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सेवेत सिंधू केअर हॉस्पिटल या भव्य वास्तूच्या रूपाने एक नविन भर टाकली आहे. याचे उद्घाटन उद्या (शनिवार) रोजी होणार आहे.

डॉ. मकरंद आणि डॉ. गौरी परुळेकर हे गेली 20 वर्षाहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांचे गणेश नगर, नेरूर रोड येथील डॉ. एस के परुळेकर हॉस्पिटल रुग्ण सेवेसाठी प्रसिद्ध आहे. डॉ मकरंद परूळेकर हे अस्थिरोग तज्ञ असून सर्व प्रकारचे रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करतात. गुडघ्याचे प्रत्यारोपण जिल्ह्यात पहिल्यांदा ह्यांनीच केले. तसेच सांध्याची दुर्बीणीद्वारे शास्त्रक्रिया देखील जिल्ह्यात सर्व प्रथम ह्यांनीच केली. तसेच मणक्याचे आजार व त्यावर लागणारी शास्त्रक्रिया ही ते करतात. भीषण अपघातात जखमी झालेले झालेले बरेच रुग्ण ह्यानी बरे केले आहेत.

ही नवीन वास्तू मुंबई-गोवा महामार्गनजिक रिलायन्स पेट्रोल येथे असल्यामुळे, अपघातग्रस्त रूग्णांना लवकर मदत मिळू शकेल. तसेच तिथे अद्ययावत तंत्रज्ञान असलेली डिजिटल एक्सरे व 4 अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष आहेत.

याचे उद्घाटन उद्या डॉ. मकरंद परुळेकर यांच्या आई श्रीमती शर्मिला शामसुंदर परुळेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

तर डॉ. गौरी परुळेकर या स्त्रीरोग तज्ञ असून, गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. सर्व प्रकारचे स्त्री रोग निदान आणि उपचार करतात. विशेषतः किशोर वयातील मुलींच्या पाळीच्या समस्या वर सल्ला व उपचार त्या करतात. गर्भाशयाच्या कर्करोगाची अद्ययावत प्रतिबंधक लस सिंधू केअर हॉस्पीटल या नूतन वास्तुत उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.