सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अवैधरित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या माध्यमातून बांदा-ओटवणे रोड परिसरात मुंबईतील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. धोंडीराम लिंबाजी गायकवाड (वय ४२, रा. ठाणे, मुंबई) आणि विशाल मारुती पठारे (वय ४३, रा‌. गोरेगाव, मुंबई) अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून बोलेरो टेम्पोसह १० लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा-ओटवणे रोड, डोंगरीकर हॉटेल जवळ गोव्यातून कांद्याची वाहतूक करणारा टेम्पो संशयास्पद वाटल्याने याची तपासणी केली असता कांद्याच्या गोणीखाली मद्यसाठा आढळून आला.

ही कारवाई दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, दीपक वायदंडे, रणजीत शिंदे यांनी केली. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.