कळे (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने पन्हाळा, गगनबावडा सेविका व मदतनीस यांच्यावतीने विविध मागण्यासाठी कळे येथे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दस्तुरी चौक परिसरात रास्ता रोको करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ती कळे पोलिसांनी सुरळीत केली.

यावेळी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीसांना वेतन लागू करा, महागाई व घरभाडे भत्ता द्या, मानधनाच्या निम्मी पेन्शन द्यावी, ग्रँच्युइटी द्या, कोरोनाकाळातील कोरोना भत्ता द्या, अंगणवाडी केंद्रांना चांगल्या सुविधा द्या, अंगणवाडी देशहिताची असून ती टिकली पाहीजे यासाठी प्रयत्न करा, सेविका, मदतनिसांना इतर खात्यांची कामे लावू नयेत आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी क्रॉ. धोंडीबा कुंभार, शुक्रा पाटील, मालुताई पोवार, संतोषी पाटील, शीतल पानारी, सायली भोगांवकर, प्रियंका पाटील, वर्षा पांगळे, बाळाबाई शिंदे, जयश्री सरनोबत, उमा सप्रे आदी उपस्थित होते.