कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोन वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाने केलेल्या आत्महत्येला कारणीभूत ठरवत आज (बुधवार) रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने बिंदू चौकात आज (बुधवार) दुपारी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

यावेळी राहुल चिकोडे म्हणाले की, लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गात प्रत्यक्षात मात्र माध्यमांच्या गळचेपीचे काम सुरू आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष संतोष भिवटे,सचिन तोडकर, अमोल पालोजी, राजू मोरे, विजय आगरवाल, जिल्हा चिटणीस प्रमोदिनी हर्डीकर, दिग्विजय कालेकर, नगरसेवक विजय खाडे-पाटील, मंडल अध्यक्ष भरत काळे, डॉ. राजवर्धन, मामा कोळवनकर, दिलीप बोंद्रे, अतुल चव्हाण, अक्षय निरोखेकर आदी उपस्थित होते.