कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ९ महिलांना भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा  उमाताई खापरे यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

उमाताई खापरे म्हणाल्या की, आजची महिला समाजामध्ये आपले कर्तुत्व दाखवून उल्लेखनीय कामगिरी करत आहे. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये महिलांनी आपले काम पार पाडत कठीण प्रसंगी आपली भूमिका सक्षमपणे निभावली आहे.

यावेळी सुनिता काळे (योग प्रशिक्षिका), अॅड.चारूलता चव्हाण, कु.ऐश्वर्या मुनीश्वर (सामाजिक कार्यकर्त्या), डॉ.चैताली कांबळे (अॅपल हॉस्पीटल कर्करोग तज्ञ), डॉ.प्रतिभा खरे, डॉ.मीना खंडेलवाल, डॉ.सुनिता देसाई, डॉ.श्रुती निप्पाणीकर (एम.डी.आयुर्वेद), दिना चौगुले (संभाजीनगर आगार) यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

प्रास्ताविक भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांनी केले. सूत्रसंचालन गौरी जाधव यांनी केले.  याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, कोल्हापूर महिला मोर्चा प्रभारी सुवर्णा पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, पिंपरी-चिंचवड महिला पदाधिकारी संजीवनी पांडे, सातारा जिल्हा उपाध्यक्षा निर्मला पाटील, भाजपा महिला मोर्चा कोल्हापूर अध्यक्षा गायत्री राऊत आदीसह भारती जोशी, सुलभा मुजूमदार, रजनी भुर्के, प्रमोदिनी हार्डीकर, विद्या बनछोडे, विद्या म्हमाणे, आसावरी जुगदार उपस्थित होत्या.