कोल्हापूर (प्रतिनिधी) : केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. भारती पाटील, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. रविंद्र भणगे, उपकुलसचिव डॉ. नीलेश बनसोडे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.