आता गृहपाठाला मिळणार सुट्टी ?

पुणे (प्रतिनिधी) : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करुन गृहपाठ बंदीवर निर्णय घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. केसरकर म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की, मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास… Continue reading आता गृहपाठाला मिळणार सुट्टी ?

टाटा-एअरबस प्रकल्प बाहेर जाऊ देऊ नका  : आदित्य ठाकरे

रत्नागिरी (प्रतिनिधी) : वेदांता-फॉक्सकॉन, त्यानंतर बल्क ड्रग्ज प्रकल्प राज्याबाहेर गेले, याची मला लाज वाटते. आता राज्यात येऊ पाहणारा टाटा-एअरबस प्रकल्प तरी गमावू नका, अशा शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला आज खडे बोल सुनावले.रत्नागिरी येथे शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोरांवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, आता उद्योगमंत्री… Continue reading टाटा-एअरबस प्रकल्प बाहेर जाऊ देऊ नका  : आदित्य ठाकरे

‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेते अजय देवगण याची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच यू-ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू धर्मातील चित्रगुप्त आणि यम देवता यांची टिंगल करण्यात आली आहे. ती आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यामुळे ‘थँक गॉड’ या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली… Continue reading ‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

कोल्हापूर- कलबुर्गी नवीन रेल्वे सुरु

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर-कलबुर्गी या नवीन रेल्वेचा प्रारंभ केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. मिरज-सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेसचा विस्तार केलेली कोल्हापूर- कलबुर्गी ही नवी रेल्वे आजपासून सुरु झाली आहे. या गाडीमुळे कोल्हापूरवरून पंढरपूरला जाणाऱ्या हजारो भाविकांची सोय होणार आहे. कोल्हापूर-सोलापूर मार्गावर यापूर्वी दिवसा धावणारी रेल्वे बंद करून रात्री सोडण्यात येत होती. यामुळे ही… Continue reading कोल्हापूर- कलबुर्गी नवीन रेल्वे सुरु

रविकिरण इंगवले यांच्यासह ४० जणांवर विनयभंगाचा गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत गंगावेस ते पापाची तिकटी रस्त्यावर शिंदे गटाच्या स्वागत बूथसमोर महिला शिवसैनिकांकडे हातवारे करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह ४० शिवसैनिकांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश माने, सोनू चौगुले यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. राज्यात शिवसेनेमध्ये… Continue reading रविकिरण इंगवले यांच्यासह ४० जणांवर विनयभंगाचा गुन्हा

जिल्हा परिषदमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत असून आज जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान फलकाचे अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी… Continue reading जिल्हा परिषदमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ

सशक्त राष्ट्र उभारणीत जनजातींचे योगदान : वंदना केंगले-साबळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राष्ट्र सशक्त आणि समर्थपणे उभे राहण्यामध्ये जनजाती समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजातील अनेक शुरवीर महापुरूषांनी देशासाठी प्राणांची आहुती दिलेली आहे. जनजाती समाज स्वातंत्र्य युध्दामध्ये सर्व शक्तीनिशी लढला होता, हा इतिहास आहे, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना केंगले-साबळे यांनी केले. राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग, केंद्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या… Continue reading सशक्त राष्ट्र उभारणीत जनजातींचे योगदान : वंदना केंगले-साबळे

नीट परीक्षेत सारा जाधव जिल्ह्यात प्रथम

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ-सावर्डे येथील सारा अभय जाधव हिने नीट परीक्षेत ६८० गुण प्राप्त करून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. देशातील सर्वोच्य वैधकीय शिक्षण संस्था एम्स येथे तिची प्रवेशासाठी निवड झाली. ती संजय घोडावत मेडिकल ॲकॅडमीची विद्यार्थ्यांनी आहे. या यशाबद्दल तिचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासाठी तिला प्रा. गुप्ता. डॉ. अनुजा… Continue reading नीट परीक्षेत सारा जाधव जिल्ह्यात प्रथम

‘हा’ सर्वोत्कृष्ट पुरस्कार यंदा छ. शाहू साखर कारखान्याला : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ-को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली ही संस्था सर्वोत्कृष्ठ कारखान्याला वसंतदादा पाटील पुरस्काराने सन्मानित करते. यंदाचा हा पुरस्कार २०२१-२२ साठी कागल येथील छ. शाहू सहकारी साखर कारखान्याला मिळाला असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी आज (गुरुवार) सांगितले. समरजितसिंह घाटगे म्हणाले की, शाहू साखर कारखान्याला राष्ट्रीय आणि… Continue reading ‘हा’ सर्वोत्कृष्ट पुरस्कार यंदा छ. शाहू साखर कारखान्याला : समरजितसिंह घाटगे

राधानगरी तालुक्यातील ‘या’ योजनांच्या खर्चावरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली…

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विशेष ९ विविध योजनांच्या कामांसाठी देण्यात आलेल्या ५८ कोटी रुपयांवर  स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठविण्याचे आदेश आज (गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले. या बैठकीत राधानगरी तालुक्यातील जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसेच आ. प्रकाश आबिटकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव… Continue reading राधानगरी तालुक्यातील ‘या’ योजनांच्या खर्चावरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली…

error: Content is protected !!