मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी केल्यानंतर राज्य सरकार गॅसवर आहे. त्यामुळे राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर कसरत सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात युद्धपातळीवर कुणबी नोंदींचा शोध सुरु आहे.

यापार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कुणबी नोंदी शोधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार मोहिम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 5 हजार 566 नोंदी सापडल्या आहेत. सर्वाधिक नोंदी या कागल व करवीर तालुक्यातील आहेत. दरम्यान, सुरुवातालीच हजारो नोंदी सापडल्याने मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात आढळतील, असा अंदाज वर्तववण्यात येत आहे.


निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली हे या कक्षाचे समन्वय अधिकारी असणार आहेत. तलाठी, कोतवाल, अन्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ऑपरेटर यासह जेलचे पोलिस कर्मचारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी अशा वेगवेगळ्या गटातील सर्व कर्मचारी सध्या कुणबी नोंदीचा शोध घेत आहेत. त्यासाठी सर्व रेकॉर्ड तपासून पाहिले जात आहे. तसेच या नोंदी शोधण्यासाठी आता स्वतंत्र कक्ष स्थापण्यात येणार असल्याची माहिती ही प्रशासनाने दिली आहे.