आजरा (प्रतिनीधी) : आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अनिरुद्ध केसरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या. उपनगराध्यक्ष विलास  नाईक यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. अनिरुद्ध केसरकर यांचे नाव मावळते उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी सुचविले. त्याला संजीवनी सावंत यांनी अनुमोदन दिले. यावेळी पिठासन अधिकारी अजिंक्य पाटील यांनी केसरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी नगरसेवक आलम नाईकवाडे, किरण कांबळे, आनंदा कुंभार, अस्मिता जाधव, सुमय्या खेडेकर, शकुंतला सलामवाडे उपस्थित होते.