नांदेड – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे, त्यामुळे देशातील राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे लवकरच लोकसभा निवडणुका सुरु होतील, तर दुसरीकडे सगळे पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते एकमेकांवर तोंड सुख घेत आरोप प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपला पक्ष कसा मोठा हे जनतेला पटवून देण्याचं काम चालू आहे असे म्हणायला काही हरकत नाही. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि काँग्रेसवर टीकास्त्र डांगले आहे. ते म्हणाले उद्धव ठाकरे यांची शिवसेना आर्धी राहिलीय. शरद पवार यांची राष्ट्रवादी आर्धी राहिलीय, हे अर्धे होतेच, पण या दोघांनी मिळून काँग्रेसला आर्ध करण्याचं काम केलं. असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढलेले आहे. भाजपचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते

अमित शाह म्हणाले “महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र झाले आहेत. एक नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि एक आर्धी उरलेली काँग्रेस. आमच्या गुजरातमध्ये एक म्हण आहे, तीन तिघाडा, काम बिघाडा. मी आपल्याला सांगायला आलोय की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आर्धी राहिलीय. शरद पवार यांची राष्ट्रवादी आर्धी राहिलीय, हे अर्धे होतेच, पण या दोघांनी मिळून काँग्रेसला आर्ध करण्याचं काम केलं. हे तीन आर्धे मिळून महाराष्ट्राचं भलं करतील का? ही एक अशी ऑटो रिक्षा आहे, जिचे तीन पाय आहेत, पण गवर्नर अम्बेसिडरचं आहे, गिअरबॉक्स फियाटचं आहे, आणि उर्वरित इंजिन मर्सडीजचं आहे. या ऑटो रिक्षाला कोणतीच दिशा नाही. या रिक्षाचं भविष्य स्पष्ट आहे. निवडणुकीनंतर आपापसातील मतभेदामुळे हे लोक तुटणार आहेत”, अशी सडकून टीका अमित शाह यांनी केली.

अमित शाह पुढे म्हणाले शरद पवार हे मोठे नेते होते तरीही त्यांनी महाराष्ट्राचा काहीही विकास केलेला नाहीं असा आरोप त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार
यांच्यावर केला. आता यावर शरद पवार काय प्रतिउत्तर देतात हे पाहणं म्हणत्वाचं असणार आहे