मुंबई – सध्या देशात लोकसभा लोकसभा रणांगण सुरु आहे. महाराष्ट्रातील तीन टप्प्यातील मतदान पार पडले आता फक्त चार टप्पे मतदान बाकी आहे. अशातच सर्व नेते जोरदार प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा देशभरातून प्रचार, सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात नंदूरबार येथे आपली जाहीर सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे मोदींनी नकली शिवसेना म्हणत ठाकरे गटावर हल्लबोल चढवला . तर दुसरीकडे त्यांनी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठी ऑफर दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांना मोठी ऑफर..!

PM मोदी म्हणाले, बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. नकली शिवसेना, NCP ने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलय” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली असली, तरी त्यांना एक ऑफर सुद्धा दिली आहे. “शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आत्ता यावर शरद काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

PM मोदी यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा ..?

PM मोदी म्हणाले , काँग्रेसला वाटतं की, पश्चिम भारतातले लोक अरबमधील लोकांसारखे दिसतात. मी जरा बाळासाहेब ठाकरेंचे नकली शिवसेनेचे पुत्र आहेत, त्यांनी जरा बाळासाहेबांना आठवावं. मला बाळासाहेंबांच्या नकली मुलाला विचारायचं, त्यांचे मेंटॉर वयोवृद्ध नेत्यालाही विचारायचंय की, यांनी म्हटलंय पश्चिम भारतातील लोक अरब वाटतात. महाराष्ट्रातील लोकांना ही भाषा मंजूर आहे? काँग्रेसला वाटतं की, उत्तर भारतातले लोक गोऱ्यांप्रमाणे दिसतात. तुम्ही हे वक्तव्य मान्य कराल? सत्तेसाठी देशाची वाटणी करणारी काँग्रेस आता भारतीयांवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यावर उतरली आहे.”