कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर द्यावा आणि स्पर्धेसाठीचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी राहुल यांच्या अध्यक्षतेखाली अभियान संदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीस तहसीलदार अर्चना कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेमध्ये शासकीय विभागांनी कृती आराखडा सादर करताना कार्यालयीन अभिलेख कक्ष, नस्तीचे वर्गीकरण व डिजिटलायझेशन, कर्मचारी बैठक व्यवस्था, दिव्यांग व महिला कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी व्यवस्था, सेवा पुस्तके, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, दैनंदिन कामकाजाचा निपटारा, शून्य प्रलंबितता, कार्यालयीन सुधारणा, सेवा हमी प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा याबरोबरच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा या बाबींना प्राधान्य द्यावे.