कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३४  जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात  ६३० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच  ७७६जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १३, भूदरगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील ४, कागल तालुक्यातील १,  करवीर तालुक्यातील ५, पन्हाळा तालुक्यातील २, राधानगरी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील १, अशा एकूण ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर करवीर येथील १, शाहूवाडी येथील २, कागल येथील १, हातकणंगले येथील २,  कोल्हापूर मधील १ आणि पन्हाळा येथील १, अशा एकूण ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर  ६३० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४७,७४२

एकूण डिस्चार्ज : ४४,७५८

उपचारासाठी दाखल रुग्ण : १३५५

एकूण मृत्यू : १६२९