पालकमंत्र्यांच्या हस्ते रिक्षा परवानाधारकांसाठी अनुदान वाटप अर्जांची सुरुवात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रिक्षाचालकांना उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाचा रिक्षाचालकांनी शंभर टक्के लाभ घ्यावा. यापुढेही रिक्षाचालकांचे जे प्रश्न आहेत ते प्राधान्याने सोडवू, अशी ग्वाही ना. सतेज पाटील यांनी दिली. ते प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित रिक्षाचालक अनुदान ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रशिक्षणावेळी बोलत होते. राज्य शासनाने रिक्षाचालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १,५०० रुपये अनुदान जाहीर केले… Continue reading पालकमंत्र्यांच्या हस्ते रिक्षा परवानाधारकांसाठी अनुदान वाटप अर्जांची सुरुवात…

१५ जूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावा : ना. जयंत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उंचगी लघु पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न संबंधित यंत्रणेने येत्या १५ जूनच्या आत मार्गी लावावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. उचंगी प्रकल्पग्रस्तांची आढावा बैठकीत बोलत होते.   ना. जयंत पाटील म्हणाले की, या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जी मदत लागेल ती करु. तसेच या प्रकल्पासाठी ज्यांची जमीन अधिग्रहण… Continue reading १५ जूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावा : ना. जयंत पाटील

हुपरीमध्ये तत्काळ कोव्हिड सेंटर सुरू करावे : मुरलीधर जाधव

इचलकरंजी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांत हुपरी शहर आणि परिसरातील गावांमध्ये कोरोना रूग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. परंतु हुपरी व परिसरातील भागांत शासनाचे कोणतेही कोव्हिड अथवा टेस्टिंग सेंटर उपलब्ध नाही. त्यामुळे हुपरी शहरात शासनातर्फे तत्काळ कोविड सेंटर आणि टेस्टिंग सेंटर  उभारण्यात यावे. अशी मागणी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी शिष्टमंडळासह आरोग्य राज्यमंत्री ना.… Continue reading हुपरीमध्ये तत्काळ कोव्हिड सेंटर सुरू करावे : मुरलीधर जाधव

जिल्ह्यातील पूर प्रश्नासंदर्भात येत्या सोमवारी आढावा बैठक : ना. जयंत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदा हवामान विभागाने सुमारे 98 टक्के इतका पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पश्मिच महाराष्ट्रातील विशेषत: सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी येत्या 31 मे रोजी वाजता झुम ॲपवर या तिन्ही जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच महसूल यंत्रणेच्या इतर अधिकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात… Continue reading जिल्ह्यातील पूर प्रश्नासंदर्भात येत्या सोमवारी आढावा बैठक : ना. जयंत पाटील

कोल्हापुरात लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे रस्त्यावर गर्दी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन रात्री संपताच आज सकाळी सात ते अकरा दरम्यान ग्राहकांनी खरेदीसाठी झुंबड उडवली. भाजीपाल्यासह विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी रास्त धान्य भाव दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. एकंदरीतच कडक लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात पुन्हा गर्दीचा अनुभव येत आहे.शहरातील मुख्य बाजार असणाऱ्या ठिकाणी भाजीपालासह इतर विक्रीसाठी… Continue reading कोल्हापुरात लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे रस्त्यावर गर्दी…

शिरोली पुलाची येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

टोप (प्रतिनीधी) : शिरोली पुलाची येथे बाबासाहेब कांबळे यांच्या शेतात तीन पानी जुगार खेळताना चौघांना शिरोली पोलिसानी अटक करून त्यांच्याकडून १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. बाबासाहेब कांबळे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये प्रितम ज्ञानदेव कुरणे, योगेश कालिदास कांबळे, रूपेश श्रीकांत कांबळे, अरूण यशवंत हंकारे (सर्वजण रा. शिरोली पुलाची) हे तीन पाणी जुगार खेळत असल्याची… Continue reading शिरोली पुलाची येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी कृती आराखडा तयार करावा : ना. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तिसरी लाट येईल का ? आणि आली तर जिल्ह्यातील लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल. या विषयी सध्या अंदाज आहेत, पण आपण सावध असले पाहिजे. त्या दृष्टीने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी हॉस्पीटल्सनी सज्ज रहावे. तसेच यासाठी लागणारा कृती आराखडा येत्या बुधवारपर्यंत तयार करावा असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी… Continue reading तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी कृती आराखडा तयार करावा : ना. सतेज पाटील

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ : १,७७४ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णंसंख्येत वाढ होत असून गेल्या २४ तासात १,७७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४६ जणांचा बळी गेला आहे. तर आज (रविवार) दिवसभरात १,४६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७,६२६ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३४०, आजरा तालुक्यातील ९, भुदरगड तालुक्यातील ७९, चंदगड… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ : १,७७४ जणांना लागण

यड्रावच्या कुमार विद्या मंदिराला उद्या शंभर वर्षे पूर्ण…

यड्राव (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्याचे प्रवेशद्वार आणि कला, क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांचे माहेरघर असलेल्या यड्राव गावातील कुमार विद्या मंदिर या प्राथमिक शाळेला उद्या (सोमवार) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या विद्या मंदिर मध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असून या विद्यामंदीरचे नाव लौकिक करत आहेत. या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे राजकीय, सामाजिक,… Continue reading यड्रावच्या कुमार विद्या मंदिराला उद्या शंभर वर्षे पूर्ण…

वाघवे, उदाळवाडी परिसरात बिबट्याचा वावर…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे निकमाचा माळ आणि उदाळवाडीतील भैरवनाथ मंदिर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यामुळे या परिसरात कोणत्याही नागरिकांनी फिरकू नये. विशेषतः या परिसरातील शेतकऱ्यांनी एकटे न फिरता शेताकडे जाताना खबरदारी घ्यावी. असे आवाहन पन्हाळा वनविभाग आणि वाघवे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. वाघवे परिसर हा पन्हाळा गडाच्या पायथ्याशी… Continue reading वाघवे, उदाळवाडी परिसरात बिबट्याचा वावर…

error: Content is protected !!