कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णंसंख्येत वाढ होत असून गेल्या २४ तासात १,७७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४६ जणांचा बळी गेला आहे. तर आज (रविवार) दिवसभरात १,४६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७,६२६ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३४०, आजरा तालुक्यातील ९, भुदरगड तालुक्यातील ७९, चंदगड तालुक्यातील ५०, गडहिंग्लज तालुक्यातील ३६, गगनबावडा तालुक्यातील ३, हातकणंगले तालुक्यातील २१९, कागल तालुक्यातील ४९, करवीर तालुक्यातील २५३, पन्हाळा तालुक्यातील १२७, राधानगरी तालुक्यातील २३, शाहूवाडी तालुक्यातील १२, शिरोळ तालुक्यातील १२७, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २८७ आणि इतर जिल्ह्यातील १६० अशा १,७७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ९७९५१.

डिस्चार्ज – ८१,०७३.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १३,५२८.

मृत्यू – ३,३५०.