इचलकरंजी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांत हुपरी शहर आणि परिसरातील गावांमध्ये कोरोना रूग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. परंतु हुपरी व परिसरातील भागांत शासनाचे कोणतेही कोव्हिड अथवा टेस्टिंग सेंटर उपलब्ध नाही. त्यामुळे हुपरी शहरात शासनातर्फे तत्काळ कोविड सेंटर आणि टेस्टिंग सेंटर  उभारण्यात यावे. अशी मागणी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी शिष्टमंडळासह आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली.

यावेळी ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हुपरी शहरामध्ये तत्काळ कोव्हिड आणि कोरोना टेस्टिंग सेंटर सुरू करण्याबाबत प्रांताधिकारी इचलकरंजी व तालुका आरोग्य अधिकारी हातकणंगले यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच हुपरी शहरात लवकरच शासनाचे कोविड सेंटर सुरू होईल, अशी माहिती मुरलीधर जाधव यांनी दिली.

यावेळी शिष्टमंडळात शहरप्रमुख अमोल देशपांडे, नगरसेवक बाळासो मुधाळे,माजी विभागप्रमुख राजेंद्र पाटील, युवासेना शहर अधिकारी भरत देसाई, रेंदाळ ग्रा.पं. सदस्य महेश कोरवी सहभागी झाले होते.