टोप (प्रतिनीधी) : शिरोली पुलाची येथे बाबासाहेब कांबळे यांच्या शेतात तीन पानी जुगार खेळताना चौघांना शिरोली पोलिसानी अटक करून त्यांच्याकडून १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

बाबासाहेब कांबळे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये प्रितम ज्ञानदेव कुरणे, योगेश कालिदास कांबळे, रूपेश श्रीकांत कांबळे, अरूण यशवंत हंकारे (सर्वजण रा. शिरोली पुलाची) हे तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहीती शिरोली पोलिसाना मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी डावात लावलेली १८ हजार ५०० आणि तीन मोटरसायकलसह १ लाख ६८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.