नाशिक ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाने आज भल्या पहाटे तब्बल 8 ठिकाणी एकाचवेळी सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. या कारवाईत या छाप्यात कोट्यावधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक परिसरात आता एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाने नाशिकवर लक्ष केंद्रित करत चार जणांच्या दहा ते पंधरा ठिकाणच्या कार्यालयांमध्ये धडक कारवाई केली होती. त्याच आता पुन्हा बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे.

या कारवाईत 8 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 3 कोटी रुपयांची सोन्याचे दागिन, बिस्किट जप्त केले असल्यांची माहिती सू्त्रांकडून देण्यात आली आहे. आयकर विभागाच्या या छापेमारीत कोट्यवधी रुपयांची कागदपत्रे आणि पेन ड्राइव्ह तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या घरातून तर काहींच्या कारमधून रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती ही समोर आली आहे.

काही बांधकाम व्यावसायिकांची पाच ते सहा तास चौकशी झाली होती. या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे यापूर्वी शहरातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले आणि सध्या मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरात कार्यरत असलेले अधिकारी रडारवर होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.