कोल्हापूर (प्रतिनिधी) : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्राचे पहिले अधिवेशन सप्टेंबरमध्ये होत आहे. सातारा जिल्ह्याने अधिवेशनाचे यजमानपद स्वीकारले असून जय्यत तयारी सुरु केली आहे. अधिवेशन संदर्भात आपल्या काही सूचना असतील तर संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष विकास भोसले तसेच सातारा जिल्ह्यातील सदस्य-पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अशी विनंती अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राजा माने यांनी केली आहे.

तर महाबळेश्वर येथे अधिवेशन नियोजनासाठी सोलापूर,कोल्हापूर व सातारा जिल्हाध्यक्षासह १३ नियोजन समिती सदस्यांनी भेट देवून पूर्वतयारीस प्रारंभ केला. देशातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार येथे अधिवेशनाचे स्थळ निश्चित केले गेले. उद्योजक प्रविण भिलारे यांनी प्राथमिक स्व प्रायोजकत्व स्वीकारले आहे. यावेळी अधिवेशन यजमान सदस्यांच्या खालील समित्या स्थापन केल्या आहेत.लवकरच या समित्यांना राज्यस्तरीय स्वरुप देण्यात येणार आहे.

स्मरणिका कमिटी – सतिश सावंत – अध्यक्ष, मंडप, जेवण व निवास व्यवस्था कमिटी – सचिन भिलारे- अध्यक्ष, स्वागत व सत्कार कमिटी- विकास भोसले- अध्यक्ष, सभासद नोंदणी कमिटी- सुहास पाटील अध्यक्ष, प्रसिध्दी कमिटी ‌- विकास भोसले अध्यक्ष,  अर्थ व नियोजन कमिटी- सतिश सावंत,संजय कदम,प्रमोद‌ तोडकर अशी आहे.