कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १५९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ५ मृत्यू आहेत. १५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ५१, आजरा – ३, भुदरगड – १, चंदगड – २, गडहिंग्लज – ८, गगनबावडा – ०, हातकणंगले – १६, कागल – ०, करवीर – २२, पन्हाळा – ६, राधानगरी – २, शाहूवाडी – २, शिरोळ – १९, नगरपरिषद क्षेत्र – २२ इतर जिल्हा व राज्यातील – ५ अशा १५९ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –
एकूण रुग्ण – २, ०४, ८५१
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ९७, ८३२
मृतांची संख्या – ५, ७२१
उपचार सुरू असलेले रुग्ण – १, २९८