कोल्हापूर ( प्रतिनिधी ) करवीर छत्रपती घराण्याच्या उज्वल परंपरेची साक्ष म्हणजे ‘कोल्हापूरचा दसरा’. कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या दसऱ्याला मान आहे.

संस्थान काळात हा शाही दसरा अतिशय उत्साही वातावरणात साजरा होत असे. आजही या महोत्सवाचे वैभव कायम आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.


प्रतिवर्षीप्रमाणे श्रीमंत शाहू महाराज, संभाजीराजे, युवराज मालोजीराजे आदींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असतो. यंदाही या कार्यक्रमास उपस्थित राहून चंद्रकांत पाटील यांनी महाराजांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, सोनं लुटण्याचा आनंद घेतला. ऐतिहासिक दसरा चौकात पारंपारिक पध्दतीने सीमोल्लंघन सोहळा देखील संपन्न झाला.