मुंबई – बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून इम्रान खान एकेकाळी प्रसिद्ध होता . त्याच्या चाहत्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने त्याच्या पहिल्या ‘जाने तू या जाने’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.पहिल्याच चित्रपटापासून इम्रान रातोरात इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाला. त्यानंतर इम्रान खानने दीपिका पदुकोण,कतरिना कैफ, करीना कपूर, कंगना रानौत अशा आघाडीच्या अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली. मात्र त्यानंतर इम्रान खान इतका अप्रतिम अभिनय दाखवू शकला नाही ना त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकले. त्यामुळे इम्रानने बॉलिवूड चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवले. त्यामुळे त्याचे चाहते खूप नाराज झाले होते . त्याचे चाहते त्याला वारंवार चित्रपटांमध्ये येण्याचा आग्रह करत होते. आता इम्रानच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे . तब्बल ९ वर्षानंतर इम्रान खान बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खानने आगामी चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. त्याने गोव्यात शूटिंग सुरू केले आहे.इम्रानसोबत या चित्रपटात मुख्य अभिनेत्री कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर मोना सिंग या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा आमिर खान निर्माता असणार आहे. यात आमिर खानची कॅमिओ भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हॅपी पटेल असे या सिनेमानाचे नाव असून, हा सिनेमा ओटीटी मध्ये लवकरच रिलीज होणार आहे.