कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड १९ तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल आणि आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी शासनाने ७ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार सुधारित दर निश्चित केले आहेत. निश्चित दर सर्व करासहित निश्चित केले असून, कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला या दरापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही.

नवीन दरानुसार संकलन ठिकाणावरुन नमुन्याची निवड करणे, नमुन्याची वाहतूक आणि अहवाल देणे, रिपोर्टींग करण्यासाठी १२०० रुपये, नमुना संग्रह ठिकाणाहून नमुना घेणे, कोविड केअर कलेक्शन सेंटर, हॉस्पिटल, दवाखाना, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा इत्यादी ठिकाणाहून नमुना घेणे यासाठी १६०० रुपये आणि रुग्णाच्या वास्तव्यापासून रुग्णाचा नमुना घेणे, नमुन्याचे वहन, तपासणी आणि अहवाल यासाठी रुपये २ हजार दर निश्चित करण्यात आला आहे. या दरामध्ये व्हीटीएम, पीपीई, आरएनए एक्सट्रॅक्शन किट, आरटीपीसीआर किट आदी बाबींचा समावेश आहे.