मुंबई – बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन साहिल खानला ताब्यात घेतले. सध्या साहिल खानची कसून चौकशी सुरु असून या प्रकरणात काही माहिती समोर येते का हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. या प्रकरणात आणखी बॉलिवूड कलाकार तर सामिल नाहीत ना? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

मुंबई पोलिसांनी कारवाई करताच अभिनेता साहिल खानने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केला होता. पण न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे. माटुंग्यामधील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी महादेव ऑनलाइन गेमिंग बेटिंग अॅप विरोधात माटुंग्या पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर जवळपास ३१ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर “द लायन बुक ॲप” नावाच्या एका ॲपमध्ये अभिनेता साहिल खान भागिदारीत असल्याचे कळताच पोलिसांनी कारवाई केली.

यानंतर साहिल खान यांची मुंबई पोलिस आयुक्तालयात चौकशी करण्यात आली होती. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊनच मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यांच्या आधारावर सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला होता. चौकशी अंती हा एकूण 15 हजार कोटींचा हा गैरव्यवहार असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत ईडीने काही दिवसांपूर्वी मालमत्तांवर जप्तीची कारवाईदेखील केली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेता साहिल खानवर अटकेची कारवाई होणार का, हे पाहणं महत्वाचे असणार आहे तसेच यामध्ये बॉलिवूड कलाकार तर सामिल आहेत का जरी असले तर कोण कोणत्या बॉलिवूड कलाकारांची नावे समोर येतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे.

महादेव बेटिंग ॲप घोटाळा नेमकं काय प्रकरण..?

महादेव बेटिंग ॲप केस हा ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मचा समावेश असलेला हाय-प्रोफाइल घोटाळा आहे ज्याने पोकर , पत्ते गेम, बॅडमिंटन , टेनिस , फुटबॉल आणि क्रिकेट यासह विविध खेळांवर बेकायदेशीर जुगार खेळण्यास प्रवृत्त करते.