मुंबई – अभिनेता आयुष शर्माने बॉलिवूडचे आपली जागा बनवली आहे. आयुष शर्मा सध्या त्याचा रुसलान’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यान आयुषने आपल्या स्ट्रगलच्या दिवसाचे काही खुलासे केले आहे. एका मुलाखतीत आयुष म्हणाला अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमातील ‘दिल्ली वाली गर्लफ्रेंड’ गाण्यात आयुष शर्मा बॅकग्राऊंड डान्सर होता. तेव्हा त्यांच्या खिशात फक्त २० रुपये होते.

आयुष शर्मा पुढे म्हणाला, ”ये जवानी है दिवानी’ सिनेमासाठी मी पहिल्यांदा मेहबूब स्टुडियोमध्ये आलो होतो. अनेकांनी मला विचारलं बॅकग्राऊंड डान्सर म्हणून का काम करत आहेस… मला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचं होतं. पण त्या दिवशी मी मेहबूब स्टुडियोमध्ये पोहोचलो तेव्हा 300 ते 400 बॅकग्राउंड डान्सर तिकडे उपस्थित होते. मी देखील त्यांच्यामधील एक होतो. ‘ते क्षण प्रचंड उत्तम होते… मनीष मल्होत्रा, दीपिका पादुकोन, रणबीर कपूर, कल्की केक्ला यांना सेटवर पाहिलं. आम्हाला ‘दिल्ली वाली गर्लफ्रेंड’ गाण्यासाठी एक स्टेप दिली होती. तेव्हा मी स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होतो. कारण मला कॅमेऱ्या समोर यायचं नव्हतं. पण तरी देखील ते मला पुढे बोलवत होते. तेव्हा माझ्याकडे फक्त 20 रुपये होते…’ असं देखील अभिनेता म्हणाला…

सध्या सर्वत्रं आयुष शर्माची चर्चा सुरु आहे. आयुषच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा मेहुणा आणि अर्पिताचा नवरा म्हणून आयुषला ओळखले जात होते. परंतु आता बॉलिवूडमध्ये त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे 2014 मध्ये अर्पिता आणि आयुष यांचं मोठ्या थाटात लग्न झालं. दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आज दोघे आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. आयुष शर्माचा सध्या रुसलान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर २६ एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. आयुष शर्मा सोबत साउथ अभिनेता जगपति बापू आणि अभिनेत्री सुश्री मिश्रा लीड रोल मध्ये दिसत आहे.