बेळगाव ( प्रतिनिधी ) प्यास फाऊंडेशनने एकेपी फेरोकास्ट्सच्या सीएसआर फंडाच्या सहाय्याने टीचर्स कॉलनी, खासबाग येथील जुन्या दुर्बल विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. या विहिरीची बऱ्याच दिवसांपासून दुरवस्था झाली होती त्यामुळे स्थानिक नगरसेविका प्रीती कामकर यांनी प्रभागातील नागरिकांसह प्यास फाउंडेशनला विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याची विनंती केली त्याच्या या विनंतीला होकार देऊन प्यास फाउंडेशन या बंद पडलेल्या विहिरीला पुनर्जीवित करून त्याला स्थिर स्वरूप देईल. बेळगाव दक्षिणचे आमदार श्री अभय पाटील यांच्या हस्ते या कामाची पूजा करण्यात आली.

यावेळी प्रीती कामकर, एकेपी फेरोकास्ट्स चे संचालक श्री पराग भंडारे, मिसेस भंडारे प्यास फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ माधव प्रभू, डॉ प्रीती कोरे, रोहन कुलकर्णी, सतीश लाड, अभिमन्यू दागा,लक्ष्मीकांत, अवधूत सामंत, सूर्यकांत हिंडलगेकर समाज सेवक विनायक कामकर,

शिल्पा हितलकेरी, आर एम हेरेकर, वी वी हडीगनाल, एन डी हितलकेरी, शंकर कांबळे, संतोष श्रींगारी, लालू बाडीवाले, अनिश पोटे, जयेश भातकांडे, बाळू मिराशी, प्रकाश श्रेयकर, विश्वनाथ येलुरकर, सुरेश हुदणुर, मुदणुर सर, देशपांडे सर, गुडी सर, मूडी सर, कड्डी सर आणि खासबागमधील अनेक नागरिकांच्या हस्ते पूजन करून या कामाची सुरुवात करण्यात आली.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विहिरीला महापालिकेकडून फिल्टर युनिट बसवले जाईल, जेणेकरुन टीचर कॉलनी वसाहतीसह खासबागमधील भागातील पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल. 1916 मध्ये ब्रिटीश काळात बांधलेली ही विहीर दुर्लक्षित झाल्यामुळे तिचे आकर्षण गमावून बसली होती परंतु आता तिला चांगले दिवस दिसू शकतात.