बिहार (वृत्तसंस्था) : बेतिया रेल्वे स्टेशनवर ऑनलाइन QR कोडद्वारे भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारा डिजिटल भिकारी राजूचा स्टेशनवरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. राजू स्वतःला देशातील पहिला डिजिटल म्हणायचा. डिजिटल इंडियाचा एक भाग असल्याचा त्याला खुप अभिमान होता. बेतिया शहरातील लोकांमध्ये राजू खुप लोकप्रिय होता.

डिजिटल भिकारी राजूची ओळख म्हणजे त्याच्या गळ्यातील QR कोड आणि हातातील टॅब. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाच्या आवाहनानंतर राजूने ऑनलाइन भीक मागणे सुरू केले होते. बेतिया रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड परिसरात QR कोडद्वारे भीक मागणारा राजू लालू प्रसाद यादव यांचाही मोठा चाहता होता. राजू स्वतःला लालू यादव यांचा मुलगा म्हणायचा. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना राजूला दिवसातून दोनवेळा रेल्वेच्या कॅन्टीनमधून जेवण मिळायचे.

राजू रेल्वे स्टेशनवर सर्वांशी अतिशय हसून खेळून बोलायचा. तो कोणालाही त्रास द्यायचा नाही. जे लोक राजूला अनेकदा आर्थिक मदत करायचे किंवा ओळखायचे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राजू आजारी होता. त्याच्यावर बेतियातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होता. दरम्यान, त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला.