दिल्ली – आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या दारु घोटाळा प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 1 जूनपर्यंत असेल. अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी 4 जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, प्रचार 48 तास अगोदर संपतो, असं सांगत न्यायालयाकडून केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला. दारु घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिली आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी हा उत्साहाचा दिवस असणार आहे.

देशात सध्या तीन टप्प्याचे मतदान पार पडले आहे. आणखी चार टप्प्याचे मतदान लवकरच पार पडू शकते . मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर येऊन आपल्या पार्टीचा प्रचार करू शकतात . तसेच अनेक सभा मुलाखती घेऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे .केजरीवाल आम आदमी पार्टीचा मोठा चेहरा आहेत. केजरीवाल प्रचारात उतरल्याने पक्ष, कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश निर्माण होणार आहे. तसेच यांच्या प्रचाराने निवडणुकित त्यांचा फायदा होणार आहे . ही गोष्ट आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीसाठी जमेची बाजू असणार आहे . अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मोकळीक दिली आहे. लोकसभेसाठी 25 मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या 6 जागा आहे. अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला. 2 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण कराव लागेल.