शिरूळ – शिरुरचे खासदार अमोल कोल्हे नेहमी कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतात. प्रचारादरम्यान केलेलं वक्तव्य असो किंव्हा त्यांच खाजगी आयुष्य बद्दल असो. अमोल कोल्हे सध्या प्रचारात व्यस्थ आहेत, यावेळी त्यांनी प्रचारादरम्यान मोठी त्यांनी घोषणा केली आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या अभिनयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण पाच वर्ष उपलब्ध असेल, असं वक्तव्य शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी ५ वर्ष अभिनयातून संन्यास घेण्याची भूमिका जाहीर केली.

काय म्हणाले अमोल कोल्हे..?

अमोल कोल्हे म्हणाले, शिरुर लोकसभा मतदारसंघाची ही जबाबदारी पुढील पाच वर्षांसाठी माझ्यावर आहे. या जबाबदारीच्या दृष्टीने, सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने, मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. आज मी सात ते आठ लोकसभा मतदारसंघात प्रचार करतोय. त्यामुळे या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी तेवढा वेळ देणं गरजेचं असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

तर विरोधकांच्या टीकेवर बोलताना अमोल कोल्हे पुढे असेही म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये मी फक्त एकच मालिका केली. विरोधकांचा धादांत अपप्रचार आहे की अमोल कोल्हे व्यस्त होते. हा जनसंपर्क कमी असण्याची काही वेगळी कारणं आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही सगळी वेगळी कारणं समोर येतील, असं म्हणत विरोधकांवर हल्लाबोलही कोल्हेंनी केलाय.

अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी छोट्या पडद्यावर ऐतिहासिक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अमोल कोल्हे यांनी रंगकर्मी, रमा माधव, रणभूमी अशा अनेक चित्रपटांमधे काम केलं आहे. स्वराच्य रक्षक संभाजीराजे या मालिकेमधून लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर त्यांचे चाहते मात्र नाराज झाले असणार हे नक्की..!