मुंबई (प्रतिनिधी) : महानगर गॅसकडून साडेतीन रुपये प्रतिकिलो सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. तर, पीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ झाली आहे. ५ नोव्हेंबरपासून हे दर लागू झाले आहेत.

देशभारासह राज्यात दिवसेंदिवस महागाईचे प्रमाण वाढले आहे. घरातील गॅस सिलिंडरपासून ते पेट्रोल- डिझेलपर्यंत प्रत्येक बाबतीत दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, महानगर गॅसकडून साडेतीन रुपये प्रति किलो सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. घरगुती पीएनजीच्या दरात दीड रुपये प्रति एससीएमची वाढ झाली आहे.

गेल्या महिन्यांत एमजीएलने सीएनजी आणि पीएनजी दरात आतापर्यंत अनेकदा वाढ केली आहे. त्यामुळे आता महागाईची झळ सर्वसामान्य मुंबईकरांना सोसावी लागणार आहे. मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर ८९.५० प्रतिकिलो, तर घरगुती पीएनजी दर ५४ रुपये प्रति एससीएम असे जाहीर करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत महागाईच्या झळा उसळल्या असून, आता पुन्हा एकदा पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.