कसबा बावडा (प्रतिनिधी) : समाजोपयोगी आणि प्रेरणादायी उपक्रमातून कसबा बावड्यातील  एका ४९ वर्षीय शेतकऱ्याने समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पांडुरंग रामचंद्र पाटील असे या तरुणाचे नाव आहे. त्यांने तब्बल शंभरहून अधिक वेळा प्लेटलेट्स दान करून अनेक रुग्णांमध्ये  जगण्याचे बळ निर्माण केले आहे.

त्याचबरोबर रक्तदान करण्यासाठीही त्याचा कायम पुढाकार राहिलेला आहे. याबद्दल त्याचा नुकताच शाहू ब्लड बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. रक्तदान आणि प्लेटसेट्स दान करण्याचे त्याचे काम पथदर्शी ठरले आहे. कोरोना महामारीत  त्याचे हे काम उभारी देणारे असून तरूणाईने त्याचा आदर्श घेण्याची गरज आहे.

वयाच्या पंचविसाव्या वर्षांपासून त्याने रक्तदाना सुरूवात  केली. आजतागायत त्याचे हे काम सुरू आहे. राजर्षी शाहू ब्लड  बँकेसह शंभरहून अन्य खासगी बँकेत त्याने अनेक वेळा प्लेटलेट्स दान केल्या  आहेत.  कोणताही मोबदला न घेता त्याचे  हे कार्य सुरू आहे. चांगली प्रकृती असलेल्या तरुणांनी प्लेटलेट्स  दान करावे, असे आवाहन पांडुरंग  यांनी केले आहे.