मुंबई – बॉलिवूड चा भाईजान सलमान खानच्या चित्रपटांसाठी चाहते नेहमी आतुर असतात. यंदाच्या रमझान ईदला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे भाईजानचे चाहते थोडे निराश झाल्याचं पाहायला मिळालं. पण सलमानच्या चाहत्यांसाठी मोठी आनांदाची बातमी समोर आली आहे. सलमानचा लवकरच नव्या चित्रपटातून ‘ रुपेरी पडदा गाजवणार आहे. सलमानने सिंकदर’ या चित्रपटाची घोषणा केली आहे . ‘सिंकदर’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. सलमानसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची चर्चा सुरू होती. आता रश्मिका मंदाना सलमान सोबत ऑनस्क्रिन रोमान्स करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘गजनी’चे दिग्दर्शक या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करणार आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिची दक्षिणेत जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. पण अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हिंदी भाषिक पट्ट्यात तिच्या चाहत्यांची संख्या वाढली. ‘ॲनिमल’मध्ये तिने रणबीर कपूरची पत्नी गीतांजलीची भूमिका साकारल्यांनंतर रश्मिका थेट भाईजानच्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर सलमान खानने सिकंदरची घोषणा केली होती. पुढच्या वर्षी ईदला तो सिकंदरच्या भूमिकेत येत असल्याचे सलमानने सांगितले होते. साजिद नाडियाडवालाच्या या चित्रपटाचा निर्माता असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जून महिन्यापासून सुरू होणार आहे. पुढील वर्षी ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होत आहे. सलमान आणि रश्मिकाच्या जोडीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.